
नायडोंगरी (वार्ताहर ) लोकनेते कै ॲड विजय शिवराम आहेर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज न्यायडोंगरी विद्यालयात आज “आपले विद्यालय आपला स्वाभिमान” हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम मोठया उत्साहात साजरा करण्यात आला या उपक्रमांतर्गत सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांकडून सामूहिक संकल्प करण्यात आला या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये अनुशासन, राष्ट्रीय भाव, सामाजिक समरसता व शाळेतील साधनसंपत्तीची काळजी घेणे, नागरिक कर्तव्यांचे पालन करणे हे मूल्य विकसित करण्यासाठी सर्व घटकांनी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे सर्व पदाधिकारी शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते
