
-गेवराई (तालुका प्रतिनिधी ) महाराष्ट्र शासनाने १ सप्टेंबर हा दिवस रेशीम दिन म्हणून घोषित केलेला असून, रेशीम उद्योगाचे महत्त्व अधोरेखित करणे आणि या उद्योगातील संधी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हा यामागचा उद्देश आहे. तरी रेशीम शेती उद्योगाद्वारे शेतकऱ्यांना शाश्वत तसेच अधिक उत्पादन मिळत असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीम लागवड करुन आपला विकास साधून रेशीम शेतीतून समृध्द व्हावे असे प्रतिपादन रेशीम विभागाचे तांत्रिक अधिकारी शेळके जी.एम.यांनी केले. राज्यात सर्वत्र १ सप्टेंबर हा दिवस रेशीम दिन साजरा करण्यात येतो त्या अनुषंगाने रेशीम संचालनालय नागपूर , जिल्हा रेशीम कार्यालय, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने गेवराई तालुक्यातील रानमळा/भाटेपुरी येथे रेशीम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी रेशीम विभागाचे तांत्रिक अधिकारी श्री.शेळके जी.एम, क्षेत्र सहाय्यक श्री.सोनटक्के ए.एम, रोजगार सेवक गणेश मोरे, शेतकरी संतोष मुळक, रविंद्र सागडे , संदिप मुळक, अशोक वाघ , विकास निकम, शंकर अडाळे, मनोज सागडे, आक्रुद निकम, हनुमान मुळक ,बाळु जाधव, ज्ञानेश्वर कुंडकर सह आदी उपस्थित होते. पुढे बोलताना इंजी शेळके म्हणाले की, रेशीम दिनाच्या माध्यमातून उद्योगाला प्रोत्साहन देणे, शेतकऱ्यांना त्यातील संधींची माहिती देणे आणि या उद्योगाचे महत्त्व वाढवणे हा यामागचा उद्देश आहे. रेशीम दिनाच्या निमित्ताने रेशीम उद्योगाशी संबंधित कार्यक्रम, कार्यशाळा, आणि चर्चासत्रे आयोजित केली जातात, जेणेकरुन शेतकरी या उद्योगाकडे अधिक सकारात्मक दृष्टीने पाहतील असेही शेवटी बोलताना त्यांनी सांगितले. यावेळी कार्यक्रमास रानमळा/ भाटेपुरी व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
