
नाशिक( प्रतिनिधी)| मराठा विद्या प्रसारक समाजदिन व राष्ट्रीय क्रीडा दिन निमित्ताने शास्त्रोक्त योगासन स्पर्धा मविप्र रावसाहेब थोरात सभागृहात संपन्न झाली त्यात न्यू मराठा हायस्कूलची इयत्ता दहावीची विद्यार्थिनी दिया वाघ ने मोठ्या गटात प्रथम क्रमांक मिळविला त्याबद्दल तिचे व तिला मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक बाळासाहेब गायकवाड यांचे मविप्र सरचिटणी ॲड.नितीनजी ठाकरे,नाशिक शहर संचालक ॲड लक्ष्मण लांडगे ,सर्व पदाधिकारी, संचालक,शिक्षणाधिकारी, शालेय समिती सदस्य, विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर शिंदे,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,पालक, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.
