
सिन्नर (प्रतिनिधी) येथील शिवाय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने शिक्षक दिनाच्या औचित्य साधून सिन्नर तालुक्यातील नऊ शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार असून संस्थेच्या वतीने या पुरस्कार्थींच्या नावाची घोषणा करण्यात आली येत्या शिक्षक दिनी सकाळी दहा वाजता महात्मा फुले विद्यालयाच्या सावित्रीबाई ज्योती सांस्कृतिक हॉलमध्ये पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब आढाव यांनी दिली. सोमठाणेच्या न्यु. इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक भाऊसाहेब माने,मऱ्हळच्या देवराम महाराज हायस्कूलचे उपशिक्षक दत्तात्रय आव्हाड सिन्नर महाविद्यालयाचे सहाय्यक प्रा. अरुण पोटे, लाखलगावच्या लोकनेते शांताराम बापू वावरे महाविद्यालयाचे प्रा.बाळासाहेब वाघ, सिन्नर महाविद्यालयाचे प्रा. जावेद शेख, महात्मा फुले विद्यालयाचे प्रा. राहुल वरंदळ. विंचूर दळवी च्या शिवछत्रपती शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक अरुण रुपवते. शेठ ब.ना. सारडा विद्यालयाच्या शिक्षिका रोहिणी परदेशी, पाटोळे घ्या जोगेश्वरी प्राथमिक आश्रम शाळेच्या शिक्षिका संगिता जगताप, यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे शिवाई संस्था नियमित विविध सामाजिक उपक्रम राबवित असते संस्थेने सहा मुलांना शैक्षणिक दृष्ट्या दत्तक घेतल्या असून त्यांना पाचवी ते दहावी पर्यंतचा शिक्षणाचा खर्च संस्थेने उचलला आहे संस्थेने गरजू रुग्णांसाठी वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून दिले आहे शहरातील कर्तृत्ववान महिलांना महिला दिनी नवदुर्गा पुरस्कार देऊन संस्था दरवर्षी सन्मानित करीत असते पाच सप्टेंबर रोजी सगर प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी नामदेव लोणारे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यास सगरचे अध्यक्ष नामदेव लोंढे व सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस बी देशमुख लोकनेते शं.बा.वाजे विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब देशमुख यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. भूषण वाघ, सरचिटणीस सचिन कोकाटे, साहेबराव सांगळे, भाऊसाहेब आढाव ,रमेश राठोड ,राजेंद्र पगार, दादासाहेब जोंधळे भारतीय आढाव यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
