
ढेकू प्राथमिक आश्रम शाळेच्या विजेत्या संघासोबत मुख्याध्यापक व शिक्षक वृंद
नांदगाव (प्रतिनिधी) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जिल्हा क्रीडा अधिकारी 2025 26 यांच्यातर्फे मांडवड येथे झालेल्या विविध क्रीडा स्पर्धेत 17 वर्षाखालील वयोगटाच्या कबड्डी खेळाच्या सामन्यात ढेकू येथील प्राथमिक आश्रम शाळेच्या संघाने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. आता या खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे .मुख्याध्यापक श्री .डी. आर . सूर्यवंशी शिक्षक अनिल सोनवणे, जानराव ताकाटे ,भामरे, गायकवाड ,यांचे मार्गदर्शन खेळाडूंना लाभले सर्व खेळाडूंचे ग्रामोदय शिक्षण संस्था नाशिक या संस्थेचे संस्थापक सरचिटणीस कृष्णराव नेरे संस्थेचे अध्यक्ष योगेश हिरे व इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक संतोष चव्हाण आदींनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.
