
मनमाड (प्रतिनिधी)येथील संत बार्णबा विद्यालयाची माजी विद्यार्थिनी ॲडव्होकेट पूजा मल्हारे हिचा गुणगौरव करण्यात आला. येथील संत बार्णबा विद्यालयाची माजी विद्यार्थिनी अँड. पूजा मल्हारे हिने एमपीएससी परीक्षेमार्फत जिल्हा न्यायालयामध्ये डायरेक्टर अकाउंट अँड ट्रेझरी डिपार्टमेंट नाशिक या ठिकाणी पोस्ट मिळवली असून ती संत बार्णबा विद्यालयाची अत्यंत हुशार अशी विद्यार्थिनी होती.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ध्येयनिष्ठ राहत तिने हिंदी या विषयात पदवी मिळवत पुढे एलएलबी पास केले. एमपीएससीचा अभ्यास करत पुढील भवितव्यात जुडीशियल मॅजिस्ट्रेट या पदाला गवसणी घालण्याचे तिचे स्वप्न आहे.यावेळी संत बार्णबा प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.डी.यु अहिरे सर, तसेच माध्यमिक विभागाचे श्री.व्हि. यू. कराड सर यांनी तिचे शाल व पुष्पगुच्छ देऊन तिचा सत्कार केला. सर्व विद्यार्थ्यांनी पूजा मल्हारे च्या कृतीचे अनुकरण करावे.अशा विद्यार्थ्यांमुळे भविष्यातील विद्यार्थ्यांना करिअर निवडण्यासाठी प्रोत्साहन मिळते.असे प्रतिपादन श्री.व्हि. यु.कराड सर यांनी केले.यावेळी ज्येष्ठ शिक्षिका सौ.आहिरे मॅडम तसेच ज्येष्ठ शिक्षक श्री.वेताळ सर हे देखील उपस्थित होते. प्राथमिक व माध्यमिकच्या सर्व शिक्षक वृंदांचे उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा झाला. कार्यक्रमाचे नियोजन श्री.पगारे सर यांनी केले. तर आभार श्री.रसाळ सर यांनी केले.
