
न्यायडोंगरी(प्रतिनिधी )ढेकू तालुका नांदगाव येथील आश्रम शाळेत ३१ऑगस्ट हा दिवस “भटके विमुक्त दिवस “म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.”इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय पुणे” यांचे दिनांक २२/०८/२०२५ चे परिपत्रकानुसार यापुढे प्रत्येक वर्षाच्या ३१ ऑगस्ट रोजी सर्व संस्थांमध्ये “भटके विमुक्त दिवस” म्हणून साजरा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत त्या निर्देशाच्या अनुषंगाने आदेशाचे पालन करून “ढेकू” तालुका नांदगाव येथील आश्रम शाळेत भटके विमुक्त दिवस मोठ्या उत्साह मध्ये साजरा करण्यात आला या दिनाचे औचित्य साधून “ढेकू” तांड्यातील बंजारा समाजाच्या पुरुष व महिलांनी या कार्यक्रमात आपला सक्रिय सहभाग नोंदवून विविध कला गुणांचे सादरीकरण केले त्यात बंजारा नृत्य , पारंपरिक वेशभूषा,लेझीम, पुरुषांचे टिपरी नृत्य,आदी प्रकार सादर करीत खऱ्या अर्थाने व शासनाचे मार्गदर्शक सूचना नुसार हा दिवस साजरा केला.या वेळी शाळेच्या मुख्याध्यापकांनी या दिवसाचे महत्त्व पटवून देत सर्व उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. या वेळी शाळेचे सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
