
नांदगाव प्रतिनिधी नांदगाव शहर व परीसरात आनंद समाधान आणि मंगलमय वातावरणात ज्येष्ठा गौरी ( श्री महालक्ष्मी ) सोनपावलाने घरोघरी आगमन झाले. परिसरात चैतन्य आणि आनंद झालेला असून जेष्ठा गौरी आगमनाने घरोघरात उस्ताहाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्री महालक्ष्मीचे रूप घरोघरी सारखेच असले तरी काही ठिकाणी आगळ्या वेगळ्या परंपरेने नटलेल्या जेष्ठा गौरी चे दर्शन होत होते .

रविवारी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखविण्यात आला. आज सोमवारी महापूजा करीत असून सुग्रास भोजणाचा नैवेद्य जेष्ठा गौरीनां दाखविण्यात येतो . आकर्षक आरास दागदागिने आभूषणे जेष्ठा गौरीनां घातल्याणे देवीचे चेहऱ्यावर प्रसन्नतेचे वातावरण होते . शहरातील कांदा व्यापारी ‘ पत्रकार सोमनाथ घोगांणे यांच्या घरी आज सौ. अंजूमताई कांदे यांनी भेट देत महालक्ष्मी चे दर्शन घेतले

यावेळी सुरेखा घोगांणे ‘ वैशाली घोगांणे ‘ मेघा घोगांणे ‘ प्रज्ञा घोगांणे पुनम घोगांणे ‘ खुशी घोगांणे ‘ मुद्वला घोगांणे यांनी स्वागत करीत सौ. अंजूमताई चां सत्कार केला. सायंकाळी घरोघरी महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो. मंगळवारी जेष्ठा गौरीनां निरोप देण्यात येईल.

