
नाशिक (प्रतिनिधी)दि. 31 ऑगस्ट 2025 रोजी भटके विमुक्त दिवसानिमित्त इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक कार्यालय नाशिकतर्फे सामाजिक न्याय भवन सभागृह येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नाशिक विभागाचे प्रादेशिक उपसंचालक मा. श्री. भगवान वीर साहेब हे होते. प्रसंगी मंचावर सहाय्यक संचालक मा. श्री. संतोष चव्हाण साहेब महाज्योतीच्या नाशिक विभागीय प्रकल्प व्यवस्थापक मा. सौ. सुवर्णा पगार मॅडम , प्रादेशिक कार्यालयाचे गट ब अधिकारी मा. श्री. सुभाष फड , प्रमुख वक्ते मा. श्री . दत्ता वायचळे ( सेवानिवृत्त नायब तहसीलदार ) , आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मा. श्री. दीपक जाधव सर , सहाय्यक संचालक कार्यालयाचे गट ब अधिकारी श्री. सुदर्शन चव्हाण , महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातील मा. श्री. मुंडे साहेब धनगर समाजाचे जेष्ठ नेते श्री शिवाजी ढेपले , श्री खंडेराव पाटील (यशवंत सेना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस) , श्री अरुण शिरोळे (अध्यक्ष, यशवंत सेना नाशिक),बापूसाहेब शिंदे (अध्यक्ष अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषद, नाशिक) , रघुनाथ कुवर (निवृत्त नायब तसीलदार) ,

मच्छिंद्र बिडकर (सरचिटणीस मल्हार सेना महाराष्ट्र राज्य मुंबई) , श्री नवनाथ ढगे (धनगर समाज सेवा संस्था प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य) , श्री किरण थोरात (महाराणी अहिल्यादेवी प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य) , श्री लक्ष्मण बर्गे (धनगर समाज युवा नेते) , श्री सोमनाथ गायकवाड (अध्यक्ष माधव सेना नाशिक) , श्री विक्रम लाखलगावकर (अध्यक्ष भटके विमुक्त विकास परिषद नाशिक) , श्री दीपक सुडके (भटक्या विमुक्ती मोर्चा नाशिक) , श्री अशोक बैरागी( सरचिटणीस अखिल भारतीय वैष्णव बैरागी परिषद नाशिक) , श्री सुभाष उगले (सचिव गोंधळी समाज युवा विकास आंदोलन नाशिक) , एडवोकेट किरण वांद्रे (अध्यक्ष ओतारी समाज नाशिक) , श्रीराम सिंग बावरी (अध्यक्ष हिंदू एकता आंदोलन परिषद ) हे उपस्थित होते . प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन झाले. सुरुवातीला गट ब अधिकारी श्री सुदर्शन चव्हाण यांनी प्रास्ताविक सादर केले. त्यामध्ये त्यांनी भटक्या विमुक्त जातींचा इतिहास व भटक्या विमुक्त दिवसाची पार्श्वभूमी सांगितली आणि आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांची थोडक्यात माहिती दिली. त्यानंतर भटक्या विमुक्तांसाठी कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांचा सत्कार समारंभ झाला तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सुद्धा सत्कार करण्यात आला. तदनंतर सेवानिवृत्त नायब तहसीलदार माननीय श्री दत्ता वायचळे यांचे व्याख्यान झाले. त्यावेळी त्यांनी भटके विमुक्त दिना ऐवजी *भटके विमुक्त गौरव दिवस* असे संबधावे अशी सूचना केली. त्यानंतर माननीय श्री नवनाथ ढगे , शिवाजीराव ढेपले , मच्छिंद्र बिडगर यांची भाषणे झाली. महाज्योतीच्या विभागीय प्रकल्प व्यवस्थापक मा. सुवर्णा पगार मॅडम यांनी महाज्योती तर्फे राबविण्यात येणारे विविध योजनांची माहिती दिली. त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांनी धनगर नृत्य बंजारा नृत्य इत्यादी कलागुणांचे सादरीकरण केले .तद्नंतर 28 तारखेला डांगसौंदाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय गुणदर्शन कार्यक्रम व सांस्कृतिक उपक्रमातील विविध स्पर्धांमधील प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच विविध क्रीडा स्पर्धांमध्ये तालुका व जिल्हा स्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा करण्यात आला. यासोबतच जिल्ह्यातील विविध आश्रम शाळांवर आरोग्य शिबिर तसेच विविध दाखले वाटप तसेच आधार कार्ड रेशन कार्ड इत्यादी वाटपाचे कॅम्प देखील आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय श्री विष्णू थोरात,वरिष्ठ निरीक्षक (इतर मागास बहुजन कल्याण प्रादेशिक कार्यालय, नाशिक) यांनी केले तर अध्यक्षीय भाषण मा. वीर साहेबांनी केले. आभार प्रदर्शन माननीय श्री संतोष चव्हाण सर यांनी केले. यावेळी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते यावेळी उपस्थित त्यांना विभागाच्या माहिती पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.
