
मराठा आरक्षण आंदोलनासाठी नाशिक एकदिलाने उभा – जिल्ह्यातून मिळतोय प्रचंड पाठिंबानाशिक जिल्ह्याचा निर्धार कायम राहिला असून आज नाशिक जिल्ह्यातून तब्बल २५ अन्नधान्याने भरलेले पिकअप मुंबईकडे रवाना करण्यात आले. सकल मराठा समाज नाशिक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून, विविध तालुक्यांतून तसेच शहरातून स्वयंस्फूर्तीने जेवणाची रसद मोठ्या प्रमाणात मुंबईकडे पोहोचवत आहे.काल झालेल्या आव्हानानुसार भाकरी–मिरची कमी करून बिस्किट,राजगिऱ्याचे लाडू, चिवडा,फरसाण तसेच पाण्याचे बॉक्स मोठ्या प्रमाणात पाठविण्यात आले.त्याचबरोबर आंदोलक बांधवांना आंघोळीसाठी लागणारा साबण,कोलगेट,ब्रश आदींचाही समावेश या रसदेत करण्यात आला आहे.या सर्व नियोजनाचे केंद्रस्थान श्री कालिका माता मंदिर परिसर, नाशिक राहिले असून,येथून केलेल्या आवाहनानंतर बारा बलुतेदार तसेच १८ पगड जातीतील समाजबांधवांनी स्वयंस्फूर्तीने हातभार लावला आहे. वेगवेगळ्या तालुक्यांतून साखळी पद्धतीने रोज अन्न व गरजेच्या वस्तू पाठविण्याचे नियोजनबद्ध काम सुरू असून, मुंबईतील समाजबांधव उपाशी राहणार नाहीत याची जबाबदारी नाशिक जिल्ह्याने घेतली आहे

.या प्रचंड समाजसहभागामुळे प्रत्येक घरातून मिळणारा पाठिंबा स्पष्टपणे जाणवत असून,आता राज्य सरकारने मराठा समाजाचा अंत पाहू नये,तर मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या तात्काळ मान्य करून मराठा समाजाला न्याय द्यावा,अन्यथा संघर्ष आणखी तीव्र होईल,असा इशारा सकल मराठा समाज बांधवांनी दिला आहे.या नियोजनात करण गायकर, नानासाहेब बच्छाव,विलास पांगरकर,केशव अण्णा पाटील, नितीन सुगंधी,आशिष हिरे,राम पाटील,करण शिंदे,राजेंद्र शेळके, नाना पालखेडे,तुषार भोसले, श्याम पाटील,निलेश शिंदे, बाळासाहेब लोंढे,संजय तुपलोंढे, किरण कोठावळे,विराज कोठावळे,अण्णा खाडे,गोकुळ पांगारकर,जगदीश पांगरकर, योगेश गांगुर्डे,निलेश चव्हाण, उमेश चव्हाण,संदीप पगार,महेश पगार,गणेश विजय पाटील, सोमनाथ कासार आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
