
गंगाधरी (प्रतिनिधी ) सावता ग्रुप गणेश उत्सव निमित्ताने गंगाधरी येथे मंडळातर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे त्या मधे महिला साठी संगिता खुर्ची स्पर्धा,बकेट बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते मुलांसाठी गंमत जंमत,निंबु चमचा ,पेपर ग्लास स्पर्धा, चित्रकला स्पर्धा,वक्रुत्व स्पर्धा, आयोजित करण्यात आली,व नांदगांव अंधश्रध्दा निर्मूलन समिती नांदगांव च्या वतिने अंधश्रध्दा निर्मुलन यावर व्याख्यान व चमत्कार दाखवून त्यांचे स्पष्टीकरण दिले त्या मधे केळिचे काप होती आपोआप, टोकदार खिळे यांच्या खडव्यांवर चालणे,

पाण्यापासून प्रसाद बनविणे,कडी काढणे,व वस्तु ओळखणे,व उकळत्या तेलातुन नाणे काढणे असे प्रयोग करून ते कसे बाबा लोक आपल्याला फसवता यावर अंधश्रध्दा निर्मूलन समिती चे अध्यक्ष प्रा.सुरेश नारायणे सर ,मारुती जगधने प्रा, विक्रम घुगे यांनी मार्गदर्शन केले या वेळी भगिरथ जेजुरकर यांनी प्रयोग करून दाखवले या कार्यक्रमाला मंडळांचे पदाधिकारी आदित्य जाधव, सौरभ खैरनार, आदेश कमोदकर, जुन्नरे,धिरज कमोदकर, सचिन सोमासे,व समस्त ग्रामस्थ व महिला शालेय विद्यार्थी उपस्थित होते आभार गोरख जाधव सर यांनी मानले नंदु भाऊ सोनवणे प्रथमेश सोमासे यांनी यासाठी विशेष परीश्रम घेतले
