
काव्यझुला काव्यसंग्रह हवा असल्यास सवलतीच्या दरात ७०+ ३०टपाल खर्च रु.१००/- मो.नं. 9960330438 या नंबरवर फोन पे करून व्हाटस अप वर स्र्किन वर पत्ता व पैसे फोन पे केल्याचा टाकावं मिळवा काव्य झुला काव्यसंग्रह
नाशिक.( प्रतिनिधी )बी एस एफ बहुउद्देशीय संस्था आयोजित आवाज लेखणीचा राज्यस्तरीय काव्य संमेलनाचे आणि पुरस्कार सोहळ्याचे आयोजन पुस्तकांचं हॉटेल, रिलॅक्स कॉर्नर, दहावा मैल, मुंबई आग्रा हायवे, ओझर, नासिक या ठिकाणी करण्यात आले आहे. या ठिकाणी शेतकरी आत्महत्या, स्त्री भ्रूण हत्या, लोकशाही, प्रेम, निसर्ग इत्यादी कवितेचे विषय आहेत. सहभागी कवींना सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल रोहिले बुद्रुक येथील नांदगाव तालुका पत्रकार मुक्ताराम रतन बागुल यांना सत्यशोधक पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. उल्लेखनीय कामगिरी केलेल्या साहित्यिक, समाजसेवक व पत्रकारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. हे राज्यस्तरीय कवी संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा 28 सप्टेंबर 2025 रोजी नाशिक येथे होणार असून आगळा वेगळा लेखणीचा राज्यस्तरीय कवी संमेलनात जास्तीत जास्त कवींनी सहभागी होऊन आपल्या लेखणीचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवावा असे आवाहन कवी संमेलनाचे मुख्य आयोजक भूषण सरदार यांनी केले आहे. नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक येथील मुक्ताराम बागुल हे रिपब्लिक वार्ता महाराष्ट्र न्यूज चे नांदगाव तालुका पत्रकार म्हणून काम करत आहेत. त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे त्यामुळे त्यांना राज्यस्तरीय सत्यशोधक पत्रकार पुरस्कार मिळत असल्याने त्यांचे नांदगाव तालुक्यासह संपूर्ण नाशिक जिल्ह्यात कौतुक होत असून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
