
रोकहिले बुद्रुक (प्रतिनिधी) :- मुक्ताराम बागुल बातमी नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीने नांदगाव पंचायत समितीला प्रधानमंत्री आवास घरकुल योजना टप्पा क्रमांक दोन मधील अपात्र लाभार्थ्यांची यादी पाठविली असून देखील नांदगाव पंचायत समितीने अपात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पहिला हप्ता पंधरा हजार रुपये टाकल्याचे सिद्ध झाले असून अद्याप पर्यंत अपात्र लाभार्थ्यांची नावे पात्र लाभार्थ्यांची यादी मधून कमी न केल्यामुळे व इतर काही मागण्यामुळे दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी रोहिले बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीत रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते मुक्ताराम बागूल अमरण उपोषण करणार आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की शासनाने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री आवास घरकुल योजना टप्पा क्रमांक दोन यादीमधील पात्र अपात्र यादी नांदगाव पंचायत समितीने रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतकडे मागितली होती. त्यानुसार रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीने नांदगाव पंचायत समितीला ऑनलाईन कुटुंब पत्रकानुसार व पक्के घर असलेल्या लाभार्थ्यांची नावे अपात्र करण्यासंदर्भात यादी दिली होती. परंतु नांदगाव पंचायत समितीने या यादीकडे दुर्लक्ष करून हेतू पुरस्कार अपात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पहिला हप्ता पंधरा हजार रुपये वर्ग केले तसेच त्यांची नावे पात्र लाभार्थ्यांची यादी मधून कमी केले नाही त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे तसेच रोहिले बुद्रुक ते गिरी हा शिवार रस्ता चे काम केले आहे. परंतु कोणाच्या नावे किती पैसे काढले रस्ता कोणी व कसा केला हे ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच यांना कुठल्याही प्रकारची माहिती नाही परंतु या रस्त्याच्या नावे लाखो रुपये काढण्याची माहिती समोर आली आहे. सदर रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला असून या रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाल्या करण्यात आलेले नाहीत. नियमानुसार मोजमापनुसार हा रस्ता झालेला नाही. त्यामुळे या रस्त्याची देखील प्रत्यक्षात पाहणी करून चौकशी करून पैसे कोणी कशाच्या आधारे काढले हे पैसे ज्यांच्या सहीने काढले गेले असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना कामावरून कमी करण्यात यावे तसेच रोहिले बुद्रुक येथील सार्वजनिक सुविधा वरील अतिक्रमण ग्रामपंचायतीने काढले मात्र अतिक्रमणाच्या ठिकाणी मातीचे व मुरमाचे ढीग असल्यामुळे रोहिले बुद्रुक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा जवळ पावसाचे पाणी तुमचे वाहून जात नाही. सदरचे मुरूम व माती काढून सपाटीकरण करून येथे नाले करून ग्रामपंचायतीने पाणी काढून द्यावे व पुतळ्याच्या आवारात पाणी तुटणार नाही याची काळजी घ्यावी. व रोहिले बुद्रुक गावठाणात अतिक्रमण झालेले आहे. ज्या लोकांनी अधिक्रमण केलेले आहे त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांच्या कुटुंबासहित अतिक्रमण धारकांची यादी व टाखले मिळावेत अशा विविध मागण्यासाठी रोहिले बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीत माजी ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते मुक्ताराम बागुल हे सदर मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत अमरण उपोषण सोडणार नाहीत असे बागुल यांनी बोलताना सांगितले.
