
नांदगाव ( सोमनाथ घोंगाणे ) नांदगाव तालुक्यातील प्रसिद्व पेढी मे. जगन्नाथ ताराचंद ( जंगूशेट ) कासलीवाल या फर्म चे श्री रिकबचंद ( काका ) कासलीवाल यांचे जेष्ट चिरंजीव नांदगाव बाजार समितीचे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्री समीर कासलीवाल यांची कन्या कुमारी आर्या हिने १९ वर्षे खालील जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवले तिने हे बक्षीस सलग चौथ्या वर्षी मिळवलेले आहे .
आपणास माहितीच आहे की समीर हा गेल्या दहा महिन्यापासून गंभीर आजाराने आजारी असून त्यांच्यावर सध्या मुंबई येथे उपचार चालू आहे. व तो पुणे येथे बहीण सौ. शमा अजमेरा हिच्याकडे रहायला आहे. वडील दहा महिन्यापासून आजारी असून घरामध्ये मोठ्या. प्रमाणात टेन्शन असतानाही आपल्या कलात्मक गुणांचं व शांत संयमी खेळ करीत कुमारी आर्या हिने हे यश संपादन केलेले आहे . आर्या ही विद्या इंटरनॅशनल स्कूल येवला या विद्यालयाची विद्यार्थीणी आहे. तिची आता विभागीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेत निवड झाली आहे
आर्या हिच्या यशामध्ये आजोबा रिकबकाका / आजी सौ. निर्मला /आई सौ. मोनीका / आत्या सौ. शमा अजमेरा यांचा मोठा वाटा आहे.
