
मनमाड (प्रतिनिधी)संत बार्णबा प्राथमिक व उच्च प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी सुरक्षा व भौतीक सुविधा विकसन समितीची बैठक पार पडली. या बैठकीला विद्यार्थी सुरक्षा व भौतीक विकास विकसन समिती, सखी सावित्री समिती, महिला तक्रार निवारण समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.दादाजी आहिरे सर व माध्यमिक मुख्याध्यापक श्री. कराड सर यांनी स्वागत व सत्कार केला .व्यासपीठावर उपस्थित मान्यवर माजी नगरसेवक.श्री.संतोष अहिरे, डॉ.झाल्टे मॅडम, माजी विद्यार्थी, पालक, व्यावसायिक, वकील, प्राथमिक विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका तसेच समुपदेशक सौ.आहिरे मॅडम,मनमाड ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस प्रतिनिधी पोलिस हवालदार सौ.आव्हाड मॅडम, पोलिस हवालदार सौ.आहेर मॅडम , सुहास क्षीरसागर, रितेश सूर्यवंशी, डमरे ताई ,ऋषिका बारळकर, गायकवाड, कातकडे मॅडम ,डोलेलू साहेब, सुनीलभाऊ, बेंद्रे ताई,रणधीर मॅडम ,दबोरा मॅडम, शेजवळ मॅडम, बेन्सन मॅडम ,अर्चना शेजवळ मॅडम ,विद्यार्थी प्रतिनिधी व विद्यार्थिनी प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते. सदर बैठकीचे विषय मांडणी आणि ठराव विश्लेषण प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.दादाजी आहिरे सर यांनी केले. समाजातील दानशूर व्यक्ती यांनी शाळेतील भौतिक सुविधासाठी मदत करावी असे आवाहन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.कराड सर यांनी केले. सदर बैठकीमध्ये लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 मध्ये तरतुदींच्या अंमलबजावणी करणे,शाळेतील विद्यार्थ्यांनी व विद्यार्थ्यीवर होणाऱ्या अत्याचाराची तक्रार पोक्सो ई बॉक्स व चिराग ॲपवर करणे व इतर उपाययोजना, शाळेतील महिला व विद्यार्थ्यांच्या तक्रार पेटी आठवड्यातून दोन वेळेस उघडणेबाबत आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माध्यमिक विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री. वेताळ सर तसेच प्राथमिक विद्यालयाच्या शिक्षिका सौ.ओहोळ मॅडम यांनी केले. आभार सौ.साबळे मॅडम यांनी मानले. चहापान नंतर सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
