
सिन्नर (प्रतिनिधी):मातोश्री चांडक कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सिन्नर येथे झालेल्या तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत उत्तुंग यश संपादन केले. एकूण 23 संघांमधून उत्कृष्ट खेळ करून 17 वर्षाखालील मुलींच्या गटात विजेतेपद तसेच 14 वर्षाखालील मुलींच्या गटात उपविजेतेपद पटकावत विद्यालयाचे नाव उज्ज्वल केले. ही स्पर्धा नाशिक शिक्षणप्रसारक मंडळाच्या शेठ ब.ना. सारडा विद्यालय यांच्या विद्यमाने व सहकार्याने पार पडली. मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त व राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सदर स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थिनींनी खेळादरम्यान उत्तम संघभावना, चिकाटी आणि कौशल्य दाखवत प्रेक्षकांची वाहवा मिळवली.या यशामध्ये विद्यालयातील क्रीडा शिक्षिका पूजा गुरुळे व प्रतिभा वाढवणे यांनी विशेष मार्गदर्शन केले. त्यांच्या परिश्रमांमुळे विद्यार्थिनींनी स्पर्धेत उत्तुंग कामगिरी केली.यशस्वी संघास स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आलेशालेय समिती अध्यक्ष श्रीराम क्षत्रिय, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री. गोरक्ष सोनवणे, मुख्याध्यापिका सौ. सुनिता कर्डिले, पर्यवेक्षिका सुवर्णा सोनवणे, स्टाफ सेक्रेटरी उत्तम भोये, पालक-शिक्षक संघ सचिव राजहंस माळी,सहसचिव जयश्री सोनवणे, खजिनदार दिपक गायकवाड, सहखजिनदार कोमल लहाने यांसह विद्यालयातील शिक्षकवर्ग व पालक-शिक्षक संघाचे सदस्य राजेंद्र पाबळे, सुनील कुऱ्हे, पोपट इलग, सचिन गोळेसर, गुलाब कांदे, गायत्री कर्नाटकी, सविता ठोक, स्मिता क्षत्रिय, सुरेखा पाटील, कावेरी गुंजाळ, मंजुषा आहेर, माया सोनवणे, रेखा वाघ, रेश्मा जहागीरदार, रोहिणी करंजकर आदींनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.तसेच शिक्षकवर्गातील अलका वाघ, उमा लोकरे, वैशाली दातीर, मंगेश जाधव, तृषाली बोडके, कुसुम सोनवणे, संयुक्ता कुलकर्णी, सुवर्णा बांबळे, नीलिमा दुसाने, रवींद्र आसवले, रेश्मा कडतन, संध्या कुलकर्णी, प्रिया कुलकर्णी, मनीषा उकाडे, सुरेखा जेजुरकर, माधुरी कुलकर्णी, सोनाली मोरे, कांतीलाल कासार, ज्योती डोंगरे, संगीता पवार, कल्पना पारखे, हरिओम भडांगे, गंगाराम उघडे, अनिता मुळे, अरुणा जमधाडे, भगवंत भोये आदींनी विद्यार्थिनींच्या क्रीडा कौशल्य वृद्धीमध्ये मोलाचे योगदान दिले.सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि शिक्षकवर्गाने विद्यार्थिनींच्या मेहनतीचे कौतुक करत विद्यालयाचा मान उंचावल्याचे गौरवोद्गार काढले .
