
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०१४ वा दिवस
*मुक्ताभिमानी मुक्तो हि बद्धो बद्धाभिमान्यपि।* *किम्वदन्तीति सत्येयं या मतिः सा गतिर्भवेत्।।*
मी मुक्त आहे ही भावना ज्याची सतत जागृत असते तो मुक्त होतो, जो सदान्कदा ‘मी बद्ध, मी बद्ध’ असे उगाळीत बसतो तो जन्मोजन्म बद्धच राहतो. ऐहिक असो वा पारमार्थिक असो, साऱ्याच बाबतीत हेच तत्त्व सत्य आहे हे लक्षात ठेव. ऐहिक जीवनात जे नेहमी निराश चित्ताचे असतात, नेहमी कपाळाला हात लावून बसतात, त्यांच्याकडून कुठलेच कार्य होत नाही. मन आणि वाणी ही अत्यंत प्रभावी असायला हवीत. ‘मी हीन मी दीन’ असे सतत घोकत राहिल्यानेच माणूस हीन दिन होऊन जातो शास्त्रेही म्हणूनच तेच सांगतात.
*स्वामी विवेकानंद…*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
★ भारतीय सौर ९ भाद्रपद (नभस्यमास ) शके १९४७*
★ भाद्रपद शुध्द /शुक्ल ८
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ रविवार दि. ३१ ऑगस्ट २०२५ ★ जेष्ठागौरी आवाहन
★ १९४० लेखक, कादंबरीकार, साहित्यिक मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांचा जन्मदिन.
★ १९७३ कोसाबाड येथील आदिवासींच्या जीवनात बालशिक्षण व सुधारणांचे नंदनवन फुलविणाऱ्या ताराबाई मोडक यांचा स्मृतीदिन.
★ १९९७ इंग्लंडची युवराज्ञी प्रिन्सेस ऑफ वेल्स डायना हेडन यांचा पॅरिसमध्ये कार अपघातात मृत्यू/स्मृतीदिन.
