
निगडोळ :(प्रतिनिधी)-रयत शिक्षण संस्थेचे मा.शरदरावजी पवार माध्य.विद्यालय निगडोळ ता.दिंडोरी जि.नाशिक या विद्यालयात गणेश उत्सवाच्या शुभ सोहळ्याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा हा हेतू मनचक्षूसमोर ठेवून विद्यालयात मा.मुख्याध्यापक बोरसे डी.डी यांच्या मार्गदर्शनानुसार विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका पी.व्ही.गायकवाड व कापडणीस एन.जे.यांनी श्रीगणेश मूर्तीकला कार्यशाळा आयोजित केली.याप्रसंगी इ.८वी ते १०वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांनी शाडूच्या मातीच्या सुंदर मुर्त्या तयार केल्या.ज्येष्ठ शिक्षक बेद्रे एस.व्ही.व वाघमारे ए.बी.यांनी विद्यार्थ्यांनी बनविलेल्या मुर्त्यांचे परीक्षण केले व गुणानुक्रम दिले.मा.मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी देवरे व्ही.ए. व भामरे टी.व्ही यांनीही सर्वतोपरी सहकार्य केले.
