
सिन्नर (प्रतिनिधी) सिन्नर सार्वजनिक वाचनालयाची निवडणूक जाहीर झाली असून, आज ( ता.३१ ऑगस्ट) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. यावेळी सत्ताधारी प्रगती पॅनल व परिवर्तन पॅनलच्या काही उमेदवारांनी आज माघार घेतल्यामुळे निवडणूक रिंगणात आता २१ उमेदवार असून,कार्यवाह पदासाठी हेमंत वाजे यांचा एकमेव अर्ज राहिल्यामुळे कार्यवाह पदाची निवड बिनविरोध झाल्याचे बोलले जाते.एकूण १३ जागेसाठी निवडणूक होणार असून , पात्र उमेदवार व जागा खालील प्रमाणे…अध्यक्ष पदासाठी एका जागेसाठी, प्रगती पॅनल चे प्रमुख कृष्णाजी भगत तसेच विरोधी परिवर्तन पॅनलचे ॳॅड. शिवाजी देशमुख यांच्यात सरळ लढत होणार आहे. तर उपाध्यक्ष पदाच्या दोन जागांसाठी, सत्ताधारी प्रगती पॅनेलचे,नरेंद्र पांडुरंग वैद्य व राजेंद्र दिनकर देशपांडे तर परिवर्तन पॅनलचे, राजेंद्र दत्तात्रय अंकार,नामदेव बाबुराव कोतवाल यांच्यात लढत होणार आहे तर विश्वस्त पदासाठी प्रगतीचे ७ उमेदवार , मनीष रघुनाथ गुजराथी, मनोजकुमार माणिकलाल भंडारी,उज्वल रघुनाथ पंडित,जितेंद्र जगन्नाथ जगताप,विलास गंगाराम पाटील,सुनील नामदेव उगले,सागर रणछोड गुजर तर परिवर्तन पॅनलचे ॳॅड.गोपाळ चिंधू बर्के, डॉ.श्यामसुंदर अंबादास झळके, प्रा.राजाराम कचरु मुंगसे,अजय हरिभाऊ शिंदे.महिला विश्वस्त ( २) पदासाठी प्रगतीचे निर्मल ताराचंद खिंवसरा, माधवी दिलीप पंडित तर परिवर्तन तर्फे एकच महिला उमेदवार कल्पना पी.परदेशी निवडणूक लढवित आहे.कार्यवाह पद बिनविरोध झाल्याने आता फक्त एकूण २० उमेदवार रिंगणात आहेत. प्रगती पॅनल साठी विमान तर परिवर्तन पॅनलसाठी जीप हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे.या निवडणुकीकडे सर्व सिन्नरकरांचे लक्ष लागलेले आहे.
