

नांदगाव.(प्रतिनिधी ) आमदार सुहास आण्णा कांदे यांनी आज नांदगाव शहरातील सुरू असलेल्या कामांची पाहणी केली.नांदगाव शहराची बाजारपेठ असलेल्या गांधी चौक भागात विविध विकासाची कामे सुरू असल्याने व्यापारी बांधवांना अडचणींना सामोरे जावे लागत होते, व्यापारी बांधवांच्या मागणी नुसार आज स्वतः काम सुरू असलेल्या ठिकाणीं आमदार साहेबांनी भेट दिली.

याप्रसंगी नगरपालिकेचे मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच संबंधित ठेकेदार उपस्थित होते. कामात होत असलेल्या दिरंगाईमुळे व्यापारी बांधवांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे त्यांच्या व्यवसायावर परिणाम होतात त्यामुळे आठ दिवसाच्या आत रस्त्यांची कामे पूर्ण झाली पाहिजे अशी तंबी सर्व अधिकाऱ्यांना दिली
