
-न्यू मराठा हायस्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करतांना उपस्थित सर्व शिक्षक,विद्यार्थी आदी..
नाशिक*|मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे न्यू मराठा हायस्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर शिंदे हे होते.व्यासपीठावर ज्ञानेश्वर कोतवाल,क्रीडा शिक्षक बाळासाहेब गायकवाड उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. विद्यार्थी मनोगतात वेदीका पाटील,पार्थ आहिरे, अनुष्का कदम यांनी क्रीडा दिनाचे महत्त्व सांगितले.शिक्षक मनोगतातुन बाळासाहेब गायकवाड यांनी क्रिडा दिनाचे महत्त्व सांगत विद्यार्थी जीवनात क्रीडाक्षेत्र किती महत्त्वाचे असते.विद्यार्थ्यांनी त्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघून आपला शारीरिक,मानसिक विकास साधला पाहिजे हे सांगितले.अध्यक्षीय मनोगतातुन ज्ञानेश्वर शिंदे यांनी व्यक्तिच्या जीवनातील खेळाचे महत्त्व सांगितले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी प्रयत्न केले.सुंदर फलक लेखन रुपाली शेडगे यांनी केले.तर सुत्रसंचालन व आभार तेजल निकम,अनुष्का देवरे यांनी केले.
