
: राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त बोरस्ते विद्यालयात ध्वजवंदन करताना मुख्याध्यापक सोपान वाटपाडे उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे आत्माराम शिंदे आदी
ओझर (प्रतिनिधी )दि.२९ वार्ताहर येथील मविप्र समाजाचे माधवराव बोरस्ते विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रारंभी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून क्रीडा ध्वजाचे ध्वजारोहण मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांच्याहस्ते झाले. प्रास्ताविक याप्रसंगी विद्यार्थ्यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर भाषणे केली. शिक्षक प्रभाकर लवांड मनोरमा उज्वला जाधव यांनी क्रीडा दिनाविषयी माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे भाऊसाहेब रौंदळ आत्माराम शिंदे दादासाहेब सोनवणे हेमंत भट बाबासाहेब गायकवाड बाबासाहेब लभडे नरेंद्र डेरले उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व पटवून देऊन खेळातून आपला मानसिक शारीरिक विकास होतो असे आवाहन केले. फलक रेखाटन मोनाली निकम यांनी केले. सूत्रसंचालन शितल हांडोरे यांनी केले. आभार क्रीडा शिक्षक प्रभाकर लवांड यांनी मानले.
