
मनमाड (प्रतिनिधी )संत बार्णबा प्राथमिक, उच्च प्राथमिक विद्यालयात आज शालेय कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.आहिरे सर यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.कराड सर उपस्थित होते तसेच ज्येष्ठ शिक्षिका सौ.अहिरे मॅडम उपस्थित होते.कथाकथन स्पर्धेसाठी बाह्य परीक्षक म्हणून सौ. तांबे मॅडम तसेच सौ.सोनवणे मॅडम यांनी काम पाहिले.कथाकथन स्पर्धेमध्ये दोन गट करण्यात आले होते. पहिला गट हा इयत्ता 3 री ते 4 थी या वर्गासाठी होता.तसेच मोठा गट हा इयत्ता 5 वी ते 7 वी ह्या वर्गासाठी होता. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपने कथाकथन स्पर्धेत सहभाग नोंदविला.प्रत्येक गटातून प्रथम,द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना अध्यक्षांच्या तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीसे वाटप करण्यात आली. तसेच सर्व विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पगार सर तसेच सौ.भालतिलक मॅडम यांनी केले. यावेळी शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
