
शब्दाकन विनोद पाटील पत्रकार
ज्यांच्या नावातच दम होता असे नानासाहेब बाजीराव सावंत यांच्या दुःखद निधनाची वार्ता समजताच संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शून्यातून विश्व निर्माण केले कुटूब , गाव , परिसर ,तालुक्याच्या हितासाठी ते नेहमी अग्रेसर राहिले नामपूर सारख्या मोठ्या गावाची पाटीलकी त्यांनी चोखपणाने सांभाळली तालुक्यातील पाटलाना लहान भावंडाप्रमाणे सांभाळले पोलीस व महसूल खात्यातील अधिकारी हक्काने त्यांना न सुटणारे कोडे सांगायचे नाना अगदी सहज ते सोडवायचे पाटीलकीचे मिळणारे मानधन गरीबाना देवून टाकायचे नामपूर सोसायटीचे सभापती होते वडिलोपार्जित व्यवसाय शेती त्यांनी कधीच सोडला नाही आधुनिक शेती ते करत असायचे उत्तम निंबू व सीताफळ चे उत्पादन ते घेत होते मृत्यू येण्याच्या आधी काही तासा पूर्वी
नामपूर ला पोलीस स्टेशन होण्यासाठी काय केले पाहिजे या बाबत चर्चा झाली व्यवहारिक ज्ञान त्यांच्या कडून खूपच शिकण्या सारखे होते
तालुक्याच्या इतिहासात कधीच विसरू न शकणारे बाजीरावनाना सर्वांना सोडून गेले
याचे दुःख सर्वांना आहे
