
लासलगाव ( प्रतिनिधी ) येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात उच्च माध्यमिक विभागातील वाणिज्य विभागाच्या वतीने गुरूवार दिनांक २८ ऑगस्ट २०२५ रोजी महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी सीएस प्रिती राजाराम गांगुर्डे यांनी पहील्याच प्रयत्नात सीएस परीक्षेत घवघवीत यश संपादन केले त्याबद्दल त्यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता तसेच वाणिज्य क्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी वाणिज्य क्षेत्रातील सीएस आणि एल.एल.बी. या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना सीएस क्षेत्रात यश संपादन करावयाचे असेल तर वाचन, मुलभूत संकल्पना समजून घेणे, इंग्रजी शब्दसंग्रह, आत्मविश्वास व प्रात्यक्षिक कौशल्यांची आवश्यकता असून वाणिज्य क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध उपलब्ध आहेत असे प्रतिपादन केले. तसेच यावेळी मार्गदर्शन करीत असताना आपण ज्या क्षेत्रात काम करणार आहोत त्या क्षेत्रातील उपलब्ध संधी, सुरक्षितता आणि पॅकेज या गोष्टींचाही विचार करावा असे विचार त्यांनी मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सोमनाथ आरोटे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नू.वि.प्र.मंडळाच्या मॅनेजिंग बोर्डाचे सदस्य मा.श्री.हसमुखभाई पटेल होते. अध्यक्षीय मनोगतात डॉ.सोमनाथ आरोटे यांनी हे महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी कायम कटिबद्ध असून, त्याचाच भाग म्हणून आजचे हे व्याख्यान आयोजित केले असून विद्यार्थ्यांनी त्याचा पुरेपूर फायदा घ्यावा व योग्य मार्ग निवडून वाटचाल करावी असे आवाहन केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.आदिनाथ मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी पर्यवेक्षक श्री.उज्वल शेलार, वाणिज्य विभागातील श्री.सुनिल गायकर, श्री.देवेंद्र भांडे, श्रीमती दीपाली कुलकर्णी, श्रीमती अश्विनी पवार, श्री.नितीन शिंदे यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमास ११वी व १२वी वाणिज्य शाखेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
