
नायडोंगरी( वार्ताहर ) लोकनेते कै.ॲड.विजय शिवराम आहेर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज न्यायडोंगरी विद्यालयात आज गणरायांना मोठ्या उत्साहात निरोप देण्यात आला.विद्यालयाच्या प्राचार्या सौ.पी. व्ही .आहेर यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या पर्यावरण पुरक गणेशोत्सव सुरू करण्यात आला.स्वच्छतेचा संदेश देत,यंदा ही दीड दिवसाच्या बाप्पांना आज निरोप देण्यात आला. विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री. टी.ई.मवाळ यांनी सपत्नीक गणपती बाप्पांची आरती केली. विद्यालयाच्या मैदानावर ढोल ताश्याच्या गजरात मिरवणुक काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी “गणपती बाप्पां मोरया पुढच्या वर्षी लवकर या…” अशा घोषणा दिल्या तद्नंतर मैदानावरच कृत्रिम तलावात गणरायांना विसर्जित करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी विद्यालयाच्या प्राचार्या सौ.पी. व्ही .आहेर , उपमुख्याध्यापक श्री. टी.ई.मवाळ,पर्यवेक्षक श्री.पी.एन. सोनेज,संस्थेचे संचालक श्री.बी.व्ही.भोसले, शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.💐💐💐💐💐💐💐💐
