
अंदरसूल ( प्रतिनिधी): अंदरसूल भूमिपुत्र व येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विद्यमान संचालक अंदरसूल उपबाजार समिती सभापती किसनराव पाटील धनगे यांचे मेहुणे येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व अंदरसूल ग्रामपालिकेचे माजी सरपंच शिवाजीराजे वडाळकर यांचे जेष्ठ बंधू येवला महाविद्यालयाचे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक प्रा रामभाऊ वडाळकर पुणे येथील महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रा राजेंद्र वडाळकर आणि पंचक्रोशीत प्रसिद्ध भुसार कांदा निर्यातदार धार्मिक कार्यात दानशूर असे लक्ष्मण वडाळकर या सर्वांचे पिताश्री प्रपंचात राहून निष्ठेने निस्वार्थीपणे परमार्थ साधणारे संत वृत्तीचे वारकरी संप्रदायाचे दर एकादशीला ग्रामफेरीत लगबगीने टाळ घेऊन ग्रामफेरीत सहभागी होणारे गावातील दररोज न चुकता सर्व मंदिरात दर्शन घेणारे पांडुरंगावर नितांत श्रद्धा असलेले पंढरपूरची वारी करणारे विठ्ठल मंदिर विघ्नेश्वर गणपती मंदिर व नागेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेण्यात अग्रेसर व आग्रही असणारे विठ्ठल मंदिर येथे सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह मध्ये हिरीरीने सहभाग घेणारे नुकतेच संपन्न झालेल्या विठ्ठल मंदिर अखंड हरिनाम सप्ताहात महाप्रसादाचे अन्नदान करणारे. ह भ प निवृत्ती पाटील वडाळकर यांचे धक्कादायक निधन मनाला चटका लावून गेले या वारकरी संप्रदायाचे निस्वार्थी निवृत्ती पाटील यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुले मुली सुना भाऊ पुतणे नातवंडे असा परिवार आहे
