नांदगाव (प्रतिनिधी ):- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या मांडवड येथील स्व शरद आण्णा आहेर जनता विद्यालय मांडवड विद्यालयात गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित श्रींची आरती पोलीस निरीक्षक भदाणे साहेब, संस्थेचे नांदगाव तालुका संचालक मा .अमितभाऊ बोरसे पाटील यांचे शुभहस्ते व शालेय समिती अध्यक्ष श्री.प्रशांतभाऊ आहेर यांच्या हस्ते मोठ्या भक्तीभावाने करण्यात आली.
या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे सभासद श्री.दिनकर भाऊ पाटील, सुनील भाऊ बोरसे, माजी सैनिक मा.बाजीराव मोहिते,आण्णासाहेब गडाख,डॉ.निकम , शालेय समिती सदस्य,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. थेटे एस.जी,ज्येष्ठ शिक्षक श्री.कवडे सर श्री.परदेशी एच टी. श्री सातपुते सर,श्री वाळके सर ,श्री. चोळके सर,श्री.आहेर संदीप सर,श्री आहेर एन ए मामा ,कुमारी शितल जाधव,तेजस्विनी कदम,सूरज पवार,प्रणय थेटे,गौरी उगले, इ.१० वीचे विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.