
मांडवड ((प्रतिनिधी) क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय नांदगाव, व स्व. शरद अण्णा आहेर जनता विद्यालय, मांडवड यांच्या संयुक्त विद्यमाने नांदगाव तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. श्री. दिगंबर भदाणे साहेब यांच्या हस्ते संपन्न झाला.

सदर कार्यक्रमासाठी मराठा विद्या प्रसारक समाज नांदगाव तालुका संचालक मा.इंजि.अमित भाऊ बोरसे (पाटील ) शिक्षण विभाग नांदगाव गटशिक्षणाधिकारी मा. श्री. चिंचोले पी. एस. ,आंतरराष्ट्रीय वेटलेफ्टिंग कोच मा.श्री. प्रवीण व्यवहारे सर, नांदगाव तालुक्याचे क्रीडा अधिकारी संजय त्रिभुवन सर, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. थेटे एस. जी. पर्यवेक्षक महाले सर व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक थेटे सर यांनी केले, आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळाचे महत्व विशद केले. आपल्या भाषणातून पोलीस निरीक्षक भदाने साहेब यांनी विद्यार्थ्यांनी खेळवृत्ती जोपासण्याचे आव्हान केले. तसेच म.वि.प्र. नांदगाव तालुका संचालक अमित भाऊ बोरसे पाटील यांनी आंतरराष्ट्रीय खेळाडू मायकल प्लेस या या 23 सुवर्णपदक विजेत्या खेळाडूचे उदाहरण देत विद्यार्थ्यांनी खेळातून करिअरचा मार्ग कसा मिळवता येईल याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे असे आव्हान केले. पंचायत समिती नांदगाव गटशिक्षणाधिकारी यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय धावपटूंचे उदाहरण देत खेळाडू वृत्ती जोपासण्याचे आव्हान केले. सदर स्पर्धेसाठी मुलांचे 14 वर्ष,17 वर्ष, व 19 वर्षाच्या आतील 50 संघांनी सहभाग नोंदवला.

सदर कार्यक्रमासाठी शालेय स्कूल कमिटीचे अध्यक्ष प्रशांत भाऊ आहेर, दिनकर भाऊ पाटील, औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदगाव शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील भाऊ बोरसे, डॉ.प्रवीण निकम, अजित आहेर, अण्णासाहेब गडाख, अशोक भाऊ निकम, सुबोध भाऊ थेटे,, महेश भाऊ मोहिते, विजय भाऊ आहेर, ज्ञानेश्वर भाऊ गावित, गोरख भाऊ थेटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडाशिक्षक संदीप आहेर सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
