
न्यायडोंगरी (प्रतिनिधी) अखेर परधाडी ता नांदगाव येथील सर्व पालक वर्ग व ग्रामस्थांच्या वतीने जि. प. मराठी शाळेस कुलूप ठोकण्यात आले. गेल्या अनेक दिवसापासून कमी असलेले शिक्षक मिळावे यासाठी सतत पाठपुरावा करीत असतानाही अधिकाऱ्यांनी केलेले दुर्लक्ष व त्यामुळे विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान यास कंटाळून गेल्या चार दिवसांपूर्वी लेखी इशारा देऊन ही येत्या २८ तारखेपर्यंत शिक्षक न दिल्यास शाळेला कुलूप लावून असा इशारा पंचायत समिती प्रशासनास देण्यात आला होता तरीही कोणतीही दखल न घेतल्याने अखेर आज (२८ऑगस्ट ) रोजी सकाळी अकरा वाजता सर्व ग्रामस्थांनी व पालकांनी एकत्र येऊन शाळेत कुलूप ठोकले त्यामुळे विद्यार्थ्यांना बाहेरच बसावे लागले तर शिक्षकांनाही त्यांचं कर्तव्य शाळेच्या बाहेर विद्यार्थ्यांना शिकवीत बजावताना दिसून आले . कुलुप लावताच शिक्षक व ग्रामस्थ यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता अनेक वेळा तर फोन न घेणे असाच प्रकार चालू राहिल्याने अखेर संतप्त नागरिक कुलूप लावून निघून गेले दुपारपर्यंत तरी कोणताही अधिकारी घटनास्थळी आलेला दिसून आलेला नव्हता यापुढे प्रशासनाकडून काय निर्णय घेण्यात येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर ग्रामस्थांशी चर्चा केली असता जोपर्यंत आमच्या शाळेस कमी असलेले शिक्षक पुरविण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही कुलूप उघडणार नाही असा पवित्रा पालकांनी घेतलेला होता.
