
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०११ वा दिवस
सतत साधनाभ्यास करीत गेल्याने हळूहळू जशी दृढता उत्पन्न होते, त्याचप्रमाणे सुरवातीला अनिच्छेने का होईना पण निष्काम कर्म आरंभिल्यास आपोआप चित्त त्यात मग्न होऊ लागते. मगच हळूहळू परहितार्थ कर्म करण्याची सत् प्रवृत्ती निर्माण होते. कळले? अनिच्छेने का होईना, एकदा परसेवा करून पाहा ना, तिने तपस्येचे फळ मिळते की नाही ते. परहितार्थ केलेल्या कर्माने मनाचा सारा स्वार्थीपणा आणि वक्रता नष्ट होते व मग माणूस निष्कपट मनाने परहितार्थ प्राणही वेचावयास हळूहळू सज्ज होतो. स्वहित साधण्यासाठी ज्या देहाचा आपण अभिमान बाळगतो तो हा आपला देह आपण परहितार्थ अर्पण करीत आहोत या विचाराने त्या अहंकाराचाही विसर पडतो.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर ६ भाद्रपद (नभस्यमास ) शके १९४७
★ भाद्रपद शुध्द /शुक्ल ५
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ गुरुवार दि. २८ ऑगस्ट २०२५
★ ऋषिपंचमी
★ संतश्रेष्ठ गजानन महाराज पुण्यतिथी, शेगाव
★ माता कलावती देवी जयंती बेळगाव
★ १६६७ जयपूरचे राजे, औरंगजेबाचे विश्वासू सरदार मिर्झाराजे जयसिंग यांचा स्मृतीदिन
★ १९०६ मराठी रंगभूमी अभिनेते, नटवर्य चिंतामण गोविंद पेंडसे तथा मामा पेंडसे यांचा जन्मदिन
★ २००१ मराठी लेखक, चित्रकार, पटकथाकार व्यंकटेश माडगूळकर यांचा स्मृतीदिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
