
नाशिक ( प्रतिनिधी). श्रीमान टी .जे .चौहान बिटको विद्यालय मोरवाडी येथे गणेशोत्सवानिमित्त वैयक्तिक नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .यात इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रसिद्ध नृत्यांगना माननीय सौ दीपा बक्षी उपस्थित होत्या. या स्पर्धेत विविध धार्मिक ,सामाजिक व देशभक्तीपर गीतांवर विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असे सादरीकरण केले यात वर्गानुसार प्रथम क्रमांक इयत्ता पाचवी -कुमारी आराध्या सुभाष फुंडे , इयत्ता सहावी -दूर्वा सुनील कांबळे इयत्ता सातवी -कुमारी शर्वरी नितीन कंक इयत्ता आठवी -चंदन प्रभाकर कोळी या विद्यार्थ्यांनी प्राप्त केले .प्रमुख अतिथी ,शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ उज्वला माळी ,पर्यवेक्षक माननीय श्री कीर्ती कुमार गहाणकरी यांच्या हस्ते नृत्य स्पर्धेतील बक्षिसपात्र विद्यार्थी व शाडू माती गणपती सजावट स्पर्धेतील विजेते विद्यार्थी यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले .संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शिवाजी मोरे यांनी तर परीक्षकांचा परिचय सौ अलका चंद्रात्रे यांनी केला .स्पर्धा यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
