
मखमलाबाद विद्यालयात श्री गणरायाच्या प्राणप्रतिष्ठेप्रसंगी तरुण उद्योजक तन्मय पिंगळे,ऋतुजा पिंगळे,प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्य रावसाहेब उशीर,पर्यवेक्षक संजय हांडगे, जुनिअर कॉलेज प्रमुख विकास थोरात,सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
मखमलाबाद ( वार्ताहर ) = मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही श्री गणरायाची प्राणप्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात संपन्न झाली. चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या गणरायाच्या स्वागतासाठी अवघे विद्यालय सज्ज झाले होते.श्री गणरायासाठी सुंदरसे स्टेज तयार करून तोरण,फुलमाळा,रंगीत कापड यापासून पर्यावरणपूरक आकर्षक सजावट करण्यात आली होती.विद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून श्री गणरायाची मिरवणूक मुलींचे लेझीम पथक व ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली.

मखमलाबादचे तरुण उद्योजक तन्मय पिंगळे व ऋतुजा पिंगळे यांच्या शुभहस्ते श्री गणरायाच्या मूर्तीची विधिवत पूजा करून प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.प्राचार्य संजय डेर्ले यांच्या शुभहस्ते तन्मय पिंगळे यांचे तर ज्येष्ठ शिक्षिका सविता आहेर,भाग्यशाली जाधव, स्वाती होळकर,योगिता कापडणीस यांच्या शुभहस्ते ऋतुजा पिंगळे यांचे स्वागत करण्यात आले.

मुळे गुरुजींच्या मंत्रोच्चारात सर्व शालेय परिसर भक्तिमय झाला होता.संगीत शिक्षक तुकाराम तांबे यांच्या गीत मंचाने अतिशय सुरेल आवाजात गणेश गीते व आरती सादर केली. कार्यक्रमास सांस्कृतिक समितीचे सहकार्य लाभले.याप्रसंगी संजय डेर्ले,उपप्राचार्य रावसाहेब उशीर,पर्यवेक्षक संजय हांडगे,जुनियर कॉलेज प्रमुख विकास थोरात,शालेय पंतप्रधान कु.आकांक्षा कथार,उपपंतप्रधान कु.आयुष पिंगळे,सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी,शालेय मंत्रिमंडळ व विद्यार्थी उपस्थित होते
