
नांदगाव (प्रतिनिधी)नांदगाव शहरातील नमन एज्युकेशन संचलित लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल आणि रेम्बो इंटरनॅशनल स्कूल मध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन झाले.आज जवळपास प्रत्येकाच्या घरात शाळा कॉलेज व इतर सार्वजनिक ठिकाणी गणेश चतुर्थीला गणपती विराजमान होतात. आता गणेशोत्सव हा महाराष्ट्र किंवा भारत इतकाच मर्यादित राहिला नाही तर जगभरात बाप्पा विराजमान होतात आणि हा गणेशोत्सव उत्साहाने साजरा केला जातो.श्री गणेश चतुर्थी या दिनाचे औचित्य साधून संस्थेचे संचालक. बागुल सर उपाध्यक्ष सौ. सरिता बागल मॅडम चिरंजीव. सार्थक बागुल व शाळेच्या मुख्याध्यापिका मिस वासंती नटराजन मॅडम यांच्या हस्ते बाप्पाचे आगमन झाले. दर वर्षाप्रमाणे याही वर्षी शाळेत गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली.ही प्रथा यावर्षी पण आजतागायत आहे. मॅनेजमेंट ने पर्यावरण पूरक शाडू मातीपासून निर्मित गणरायाची प्राणप्रतिष्ठा व यथासांग पूजा करून गणपती बाप्पा स्कूलमध्ये विराजमान करण्यात आले.याप्रसंगी मॅनेजमेंट ,सर्व शिक्षक व शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारीद्वारे ढोलताशा व लेझीमच्या गजरात बाप्पाचे स्वागत जल्लोषात करण्यात आले. यातून स्कूलमध्ये एकता व आनंदाचे दर्शन दिसून आले.स्कूलचे प्रिन्सिपल सर्व शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी मनोभावे बाप्पाची पूजा केली.भगवान श्री गणेश हे बुद्धी आणि समृद्धीचे प्रतीक आहेत त्यामुळे या उत्सवातून घरात व समाजात शांती व आनंद नांदो अशी प्रार्थना स्कूलच्या वतीने करण्यात आली आज स्कूलचे वातावरण आनंदाचे व उत्साहाचे होते.
