
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०१० वा दिवस* धर्माच्या इतिहासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे – प्रेमाकरिता प्रेम, कर्तव्यासाठी कर्तव्य, कर्मासाठी कर्म. आणि सर्वश्रेष्ठ अवतार जो श्रीकृष्ण त्याच्या तोंडून, या भारतभूमीमधे, मानवाच्या इतिहासात अगदी प्रथमच हे तत्त्व बाहेर पडले. भीतीचा व प्रलोभनांचा धर्म केव्हाच मागे पडला, आणि नरकाची भीती व स्वर्गीय भोगांचे प्रलोभन ही मानवी हृदयात स्वभावतः असूनही प्रेमाकरिता प्रेम, कर्मासाठी कर्म व कर्तव्यासाठी कर्तव्य यासारखी उत्तुंग ध्येये अवतीर्ण झाली. *स्वामी विवेकानंद…*
*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर ५ भाद्रपद (नभस्यमास ) शके १९४७
*★ भाद्रपद शुध्द /शुक्ल ४
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ बुधवार दि. २७ ऑगस्ट २०२५ ★ श्री गणेश चतुर्थी
★ पार्थिव गणेशाची प्राणप्रतिष्ठा
★ श्रीपाद श्रीवल्लभ जयंती, पिठापूर
★ १८५४ प्रख्यात कायदेपंडित, विद्वान, राजकीय नेते, लोकमान्य टिळकांचे सहकारी ‘वर्हाडचे नवाब’ गणेश श्रीकृष्ण तथा दादासाहेब खापर्डे यांचा जन्मदिन.
★ १९७६ आपल्या तीस वर्षाच्या कारकीर्दीत दहा हजाराहून अधिक गीतांना आवाज देणारे पार्श्वगायक मुकेश चंद्र माथुर यांचा स्मृतिदिन.
★ गणेश उत्सवाच्या आनंदमय, मंगलमय व चैतन्यमय हार्दिक शुभेच्छा 🕉️🕉️🔯🔯
