
नांदगाव (प्रतिनिधी) भाद्रपद शुक्ल द्वितीया, म्हणजेच भादवा बीच निमित्त श्री बाबा रामदेवजी यांचा जन्मोत्सव नांदगाव शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री बाबा रामदेव भक्त मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात सकाळपासून भक्तगणांनी दर्शन व भजन संधेत सहभाग घेतला.या प्रसंगी सौ. अंजुमताई कांदे यांनी उपस्थित राहून श्री बाबा रामदेवजींच्या प्रतिमेचे दर्शन घेतले आणि भक्तिमय भजन संधेत सहभागी झाल्या.सायंकाळी पाच वाजता गांधी चौकातून भव्य पालखी सोहळ्याची सुरुवात झाली. ढोल-ताशांच्या गजरात आणि टाळ-मृदंगांच्या निनादात नांदगाव शहरातील प्रमुख मार्गावरून शोभायात्रा काढण्यात आली.रात्री श्री संत सावता महाराज मंदिर कंपाउंड येथे जमा जागरणाचा कार्यक्रम झाला. भजन, कीर्तन आणि भक्तिगीतांच्या वातावरणात उपस्थित भाविकांनी मोठ्या आनंदात उत्सवाचा आस्वाद घेतला.हा उत्सव भक्तिमय वातावरणात पार पडल्याने संपूर्ण नांदगाव शहरात आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
