
सिन्नर (. प्रतिनिधी ) महाराष्ट्र टॅलेंट सर्च (एमटीएस) परीक्षेत तालुक्यात चांडक कन्येची स्वरा सोनवणे हिने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवत तालुक्याचा मान उंचावला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत शाळेचा व तालुक्याचा नावलौकिक वाढवला आहे.गटशिक्षणाधिकारी विजय बागुल ,विस्ताराधिकारी कैलास सांगळे ,केंद्र प्रमुख दत्तात्रय गवळी शालेय समिती अध्यक्ष श्रीराम क्षत्रिय, पालक-शिक्षक संघ उपाध्यक्ष गोरक्ष सोनवणे,मुख्याध्यापिका सौ. सुनीता कर्डीले, पर्यवेक्षिका सौ. सुवर्णा सोनवणे तसेच सर्व शालेय समिती सदस्य, पालक-शिक्षक संघ सदस्यांनी स्वराचे विशेष कौतुक केले.

तिला निलिमा दुसाने, प्रिया कुलकर्णी, संध्या कुलकर्णी, आसावरी बर्वे, प्रतिभा वाढवणे, पल्लवी बच्छाव, दिपक गायकवाड, राजहस माळी ,उत्तम भोये या शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन लाभले.या यशस्वी विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत तिला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
