
ढेकू (प्रतिनिधी ) ढेकू माध्यमिक आश्रम शाळेचा खो-खो चा संघाने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला व जिल्हा स्तरावर निवड महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद नाशिक यांच्या मार्फत सन 2025 26 च्या विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यानियोजनानुसार नांदगाव तालुकास्तरीय 17 वर्षाच्या आतील वयोगटाच्या खो-खो खेळाचे सामने सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे आयोजित करण्यात आले त्यामध्ये ढेकू येथील माध्यमिक आश्रम शाळेच्या संघाने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला व त्यांची त्जिल्हास्तरावर निवड झाली संघाची जबाबदारी कर्णधार रवींद्र राठोड यांनी पार पाडली तर त्याच्यासोबत आनंद राठोड ,सागर राठोड ,हेमराज राठोड ,सुनील राठोड ,प्रथमेश राठोड ,शुभम चव्हाण विशाल चव्हाण इयत्ता दहावी तर शैलेश राठोड ,सुदर्शन चव्हाण इयत्ता नववी या खेळाडूंनी सहभाग घेतला .त्यांना श्री देवरे बि. के., श्री कामडी एस. एम., श्री चव्हाण आर बी ,श्री धाकतोडे आर.जी व शाळेचे मुख्याध्यापक श्री जे एम थोरात यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व खेळाडू व संघाला ग्रामोदय शिक्षण संस्थेचे संस्थापक सरचिटणीस श्री कृष्णरावजी नेरे ,संस्थेचे अध्यक्ष श्री योगेशजी हिरे. व इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक श्री संतोष चव्हाण, आदींनी अभिनंदन केले व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या🌷🌷🌷
