
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३००९ वा दिवस
नीतिपराययण व्हा, वीर बना, निष्कपट बना, तुमच्या चारित्र्याला कोणत्याही प्रकारचा कलंक लागू देऊ नका, प्रत्यक्ष मृत्यूशी सामना करण्याची हिंमत ठेवा. धर्माच्या निरनिराळ्या सिध्दातांनी आपला मेंदू शिणवू नका. भित्री माणसेच पाप करीत असतात; जे खरे वीर असतात ते कधीच पाप करीत नाहीत.
स्वामी विवेकानंद..
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर ४ भाद्रपद (नभस्यमास ) शके १९४७
★ भाद्रपद शुध्द /शुक्ल ३
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ मंगळवार दि. २६ ऑगस्ट २०२५
★ हरितालिका
★ १९१० भारतरत्न व नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांचा जन्मदिन.
★ १९२२ समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ, लेखक, राजकारणी, महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती ग. प्र. प्रधान यांचा जन्मदिन.
★ १९४४ लेखक व सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचा जन्मदिन.
