
नांदगाव (प्रतिनिधी) समृद्धी सहकारी बँक लि. नांदगावच्या चेअरमन तथा आमदार सुहास कांदे यांच्या पत्नी अंजुमताई श्वास कांदे यांचा वाढदिवस संपूर्ण नांदगाव मतदारसंघात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सोमवारी दि. 25 रोजी अंजुमताई कांदे यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळपासून त्यांच्या नांदगाव येथील बंगल्यावर कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती याशिवाय मतदारसंघात विविध उपक्रम देखील राबविण्यात आले. नांदगाव मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासात आमदार सुहास आण्णा कांदे यांच्यासोबत दिवस रात्र झटणाऱ्या अंजन ताई यादेखील जनतेच्या सेवेत तप्तर आहे मतदारसंघातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळावे यासाठी त्यांनी स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यास शासनाच्या विविध योजनांमधून महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून दिला आहे.

समृद्धी सहकारी बँकेच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे आमदार सुहास कांदे यांच्यासोबत यांच्यासोबत तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी झटत मनमाडचा पाणी प्रश्न सोडविला आहे. मालेगाव त तालुक्यातील गावांसाठी पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी मोठे योगदान दिले आहे सोमवारी दिनांक 25 रोजी अंजुमताई कांदे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

नांदगाव मतदारसंघातून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी नांदगाव मतदारसंघातील तसेच जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील महिला देखील उपस्थित होत्या यावेळी सर्वांचे स्वागत करण्यात आले.
