
मुळडोंगरी (प्रतिनिधी ) 12 व्या शतकातील एक तत्त्वज्ञ व समाज सुधारक आणि महानुभव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांचे जयंती सरस्वती माध्यमिक विद्यालय मूळडोंगरी येथे साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष श्री.एस.जी. राठोड साहेब व सचिव सिद्धांत दादा राठोड अध्यक्षस्थानी लाभले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ बोरसे एस एस मॅडम यांनी प्रतिमेपूजन केले. सहशिक्षक श्री पाटील एस एस सर यांनी विद्यार्थ्यांना श्री चक्रधर स्वामी यांच्या जीवनावर आधारित माहिती दिली. तसेच काही विद्यार्थ्यांनी श्री चक्रधर स्वामी यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले, याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.*
