
लासलगाव,(प्रतिनिधी ) दि.२५: भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांची जयंती नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना +२ स्तर विभागाच्या वतीने साजरी करण्यात आली. उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक श्री.उज्वल शेलार यांनी महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ, श्री चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. श्री चक्रधर स्वामींची जयंती सर्वत्र ‘अवतार दिन’ म्हणून साजरी केला जाते. श्री चक्रधर स्वामी १२व्या शतकातील एक तत्त्वज्ञ, समाजसुधारक आणि महानुभाव पंथीयांचे संस्थापक होते. दरवर्षी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावेळी रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी श्री.देवेंद्र भांडे, श्री.सुनिल गायकर तसेच उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी श्री.देवेंद्र भांडे, श्री.सुनिल गायकर आणि रा.से.यो. स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.
