
नांदगाव (प्रतिनिधी) मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे होरायझन अकॅडमी नांदगाव शाळेत गणेश मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली .विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत मातीपासून सुंदर गणपती मूर्ती साकारल्या. या कार्यशाळेत पूर्व प्राथमिक व प्राथमिक गटातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला विद्यार्थ्यांना शालेय कलाशिक्षक सौरभ शेवरे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचे उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबद्दल जागरूकता निर्माण करणे हा होता विद्यार्थ्यांनी नैसर्गिक माती रंग व अन्य साहित्यांचा वापर करून बनवल्या.

शालेय प्राचार्या पुनम डी. मढे म्हणाले की विद्यार्थ्यांच्या हस्तकलेचा आणि सर्जनशीलतेचा छान नमुना या कार्यशाळेत पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना देखील मान मिळवला. पर्यावरण पूरक गणेशमूर्ती विद्यार्थ्यांनी बनविल्या. गणेश उत्सव साजरा करताना पर्यावरणाचे रक्षण व्हावे यासाठी शाळेचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरेल. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शालेय सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
