
नांदगाव ( प्रतिनिधी ) नांदगाव तालुका माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय सेवक सहकारी पतसंस्थेच्या नवीन चेअरमनपदी श्री. अशोक मार्कंड,व्हा.चेअरमनपदी श्री. संजय पवार व कार्यवाह पदी श्री.संतोष इप्पर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे पतसंस्थेच्या कामकाजाला एक नवीन दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी संस्थेतील अनुभवी आणि जुने सभासद आहेत. संस्थेच्या हितासाठी आणि सभासदांच्या कल्याणासाठी ते काम करतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी नांदगाव पंचायत समितीचे मा.सभापती विलासभाऊ आहेर,संस्थेचे संस्थापक पी.आर.पाटील, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राजेंद्र देवरे व माजी चेअरमन राजेश हिरे तसेच संस्थेच्या संचालक मंडळातील माजी चेअरमन प्रमोद चव्हाण,महेन्द्र जाधव संचालिका पल्लवीताई पाटील, प्रियंका पाटील संचालक जिभाऊ खताळ,योगेश पगार,आनंद चकोर उपस्थित होते.तालुक्याचे आमदार सुहास आण्णासाहेब कांदे यांनी तिघही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मविप्र संस्थेचे तालुका संचालक इंजि. अमित भाऊ बोरसे पाटील, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्योती काळे, उपमुख्याध्यापक दीपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश चव्हाण व सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.नांदगाव तालुका माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय सेवक सहकारी पतसंस्था ही तालुक्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आर्थिक संस्था आहे. ही संस्था आपल्या सभासदांना आर्थिक मदत आणि विविध योजना उपलब्ध करून देते. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था आणखी प्रगती करेल,अशी आशा यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
