
नामपूर (प्रतिनिधी ) महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित , समाजश्री प्रशांतदादा हिरे कला, विज्ञान आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय नामपुर .सोमवार , दिनांक – २५ ऑगस्ट २०२५ रोजी नामपुर विद्यालय येथे शिक्षक -पालक मेळावा संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य श्री डॅा. डि.एफ.शिरूडे सर तथा महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री एम.व्ही.दासनुर सर हे होते . कार्यक्रमाचे पालक प्रतिनिधी भालचंन्द्र सोनवणे हे उपस्थित होते.विद्यार्थी-पालक व शिक्षकांमध्ये संवाद व्हावा, विद्यार्थ्याची प्रगती समजावी या उद्देशाने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.मेळाव्याची सुरुवात सरस्वती पूजन व संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. विद्यालयाचे उपप्राचार्य महेन्द्र दासनुर सर यांनी प्रास्तविक केले. विद्यार्थ्यांना व पालकांना श्री अमित सोनवणे सर ,श्री डॅा.आनंद जोशी सर , श्री पी.पी.महाले सर यांनी मार्गदर्शन केले. व विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्याचे नीरसन केले. अध्यक्षीय भाषणात विद्यार्थी-पालक सुसंवाद कसा असावा याबद्दल विविध ऊदाहरणे दिले .या मेळाव्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
