
सुतारखेडे (प्रतिनिधी ) “दिनांक 25 ऑगस्ट 2025 वार सोमवार रोजी शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका श्रीमती संजीवनी कांबळे यांच्या मार्गदर्शनाने गणेशोत्सवानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी आनंदाने सहभागी होत पर्यावरणपूरक मातीच्या तसेच शाडू मातीच्या सुंदर ,आकर्षक अशा गणपती बाप्पाच्या विविध मूर्ती तयार केल्या. शाळेच्या कलाशिक्षिका श्रीमती प्रमिला ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना मूर्ती बनवण्याविषयी मार्गदर्शन केले

.कार्यशाळा संपन्न करण्यासाठी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री दिगंबर शेळके, श्रीमती सुवर्णा पवार, श्री दत्तू सोनवने, श्री शैलेश वाघ, श्री विश्वास पाटील, श्रीमती योगिता जाधव, श्री ज्ञानेश्वर जामदार, श्री सनी गायकवाड, श्री किरण उघडे, श्री किशोर शिंदे आदींनी परिश्रम घेतले.
