
मोरेवाडी (प्रतिनिधी ) स्वामी विवेकानंद सोसायटी संचलित श्रीमान टी. जे. चौहान माध्यमिक विद्यालय, मोरवाडी येथे *सायबर सुरक्षा* अभियानांतर्गत सायबर गुन्हे जनजागृती उपक्रम राबविण्यात आला.यावेळी सायबर संस्कार संस्थेचे पदाधिकारी , पत्रकार, व लेखक तन्मय दीक्षित, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उज्वला माळी व्यासपीठावर उपस्थित होते.पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल वापर, विविध गेम्स ,त्याचे धोके व घ्यावयाची दक्षता याबाबत सविस्तर माहिती दिली .मोबाईल वापर करत असताना वेळेची मर्यादा ठेवून मोबाईल वापर केल्यास आपली शारीरिक आणि मानसिक आणि आर्थिक हानी होणार नाही याबाबत पाहुण्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. व विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया शेवाळे यांनी तर परिचय अलका चंद्रात्रे यांनी केले.आभार प्रदर्शन प्रिया पवार यांनी केला . यावेळी मुख्याध्यापकांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांना भेटवस्तू व गुलाब पुष्प देऊन त्यांचे आभार मानण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी चित्रा येवले व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
