
नाशिक (प्रतिनिधी ) द्राक्ष विज्ञान मंडळ नाशिक च्या महिला द्राक्ष उत्पादकाचा आगामी द्राक्ष हंगाम व द्राक्ष पिक व्यवस्थापन संदर्भात सोनकुळ अग्रो इंडस्ट्री येथे अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता ! सदर कार्यक्रमात म रा द्रा बा संघाचे माजी अध्यक्ष श्री साहेबराव दवंगे म्हणाले की , द्राक्ष शेतीत महिलांचे योगदान अतुल्य आहे त्यांना द्राक्ष पिक व्यवस्थापन संदर्भात शास्त्रीय माहिती मिळाली पाहिजे त्यामुळे उत्पादन खर्चात बचत होऊन दर्जेदार द्राक्ष पीक मिळेल ! मृदा तज्ज्ञ डॉ भोंडे ह्यानी मृदा संवर्धन. ही काळाची गरज असून शेतीत मृदा संवर्धनासाठी महिलांनीही मृदा संवर्धनाचे तंत्र आत्मसात करणे आवश्यक असून मृदा संवर्धन बद्दल सविस्तर माहिती दिली ! श्री जगदीश पाटील ह्यानी यू के आय ( युनिफाइड कृषी इंटरफेस) तंत्रज्ञानाबद्दल माहिती देवून भविष्यात ही प्रणाली शेतकऱ्यांसाठी काळाची गरज असल्याबद्दल सविस्तर माहिती दिली ! श्री महेश वाणी ह्यानी जैविक कृषी निविष्ठा वापराबद्दल माहिती दिली ! प्रसंगी महिला शेतकऱ्यांना जैविक कृषी निविष्ठा निर्मिती ,सेंद्रिय खत निर्मिती , माती पाणी परीक्षण बद्दल सविस्तर प्रात्यक्षिक दाखवण्यात आले ! कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन द्राक्ष विज्ञान मंडळ नाशिक चे अध्यक्ष डॉ वसंत ढिकले ह्यानी केले ! आभार प्रदर्शन सोनकुळ अग्रो इंडस्ट्रीज चे संचालक श्री महेश वाणी ह्यानी केले ! सदर अभ्यास दौऱ्यात बहुसंख्य महिला शेतकरी उपस्थित होत्या ! कार्यक्रमासाठी द्राक्ष विज्ञान मंडळ नाशिक चे संचालक श्री रामदास मोरे , श्री साहेबराव गायकवाड , श्री गोविंदराव गायकवाड , श्री बाळासाहेब शिंदे , राहुल मोरे , आदिनी परिश्रम घेतले !
