
विंचूर दि.२५(.संदीप शिरसाट ) विंचूर ग्रामपालिकेचे माजी सरपंच व प्रसिद्ध सराफ व्यावसायिक अविनाश दुसाने व अतुल दुसाने यांच्या मातोश्री कै.विमल वासुदेव दुसाने यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्रातील नामवंत वक्ते ह.भ.प.विवेक घळसासी यांच्या सुमधुर वाणीतून सात दिवसीय श्रीरामकथेचे आयोजन करण्यात आले आहे. येथील निसर्ग मंगल कार्यालयात दि.२६ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीत व रात्री ८ : ०० ते १० : ०० या वेळेत तर १ सप्टेंबर रोजी सकाळी १० :३० ते दुपारी १२ : ३० या वेळेत श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील नागरिकांनी श्रवणाचा लाभ घ्यावा. असे आवाहन दुसाने परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
