
नांदगाव (प्रतिनिधी)नांदगाव मतदार संघाचे आमदार सुहास कांदे, यांना यंदाचा धर्मभूषण पुरस्कार अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या नांदगाव शाखेच्या वतीने आज सन्मानपूर्वक सन्मानित करण्यात आला. नांदगाव येथील श्रीकृष्ण ध्यान मंदिर येथे चक्रधर स्वामींच्या ८०३ वी जयंती कार्यक्रम या ठिकाणी आयोजित उत्सव साजरा करण्यात आला.या ठिकाणी आमदार सुहास आण्णा कांदे यांचे प्रयत्नातून झालेल्या दीड कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. या मध्ये संरक्षक भिंत सभामंडप व सांस्कृतिक भवन या कामाचे लोकार्पण करण्यात आले.कार्यक्रमाची ध्वजारोहणाने सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रमुख मान्यवरांचा सत्कार नांदगाव तालुका मानुभाव समितीच्या वतीने करण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार अनिल दादा आहेर, माजी आमदार संजय पवार, माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, अरुण पाटील, चेतन पाटील, मनमाड चे माजी नगराध्यक्ष साईनाथ गिडगे, योगेश पाटील, जिल्हा परिषदेचे माजी गटनेते राजेंद्र पवार, माजी सभापती विलास आहेर, प्रमोद भाबड, नरेंद्र पाटील, अंकुश कातकडे,संजय आहेर, अमोल नावंदर, नुतन कासलीवाल, सागर हिरे, प्रकाश शिंदे, सुनील जाधव, समाधान पाटील, दत्तू पवार, वकील संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण बिन्नर, भास्कर उगले तसेच प्रमुख महंत अखिल भारतीय मानुभाव परिषदेचे महासचिव आचार्य चिरडे बाबाजी, महंत खामनीकर बाबाजी, कानळसकर बाबा, मुकुंद राज बाबा पालीमकर, अनेक संत महंत, तपस्वीनी,उपदेशी भाविक व असंख्य नागरिक उपस्थित होते यावेळी प्रमुख संत महंतांचे हस्ते सुहास कांदे यांना सन्मान चिन्ह, मानपत्र देऊन धर्मभूषण पुरस्काराने सन्मानपूर्वक सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष प्रदीप अहिरे सर यांनी केले यावेळी श्री. संजय आहेर, माजी आमदार अनिल आहेर,माजी आमदार संजय पवार आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
